पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अंग / अङ्ग / Organ

इमेज
शरीरातील समान कार्य करणाऱ्या पेशीं चा / ऊतींचा समूह, अवयव. उदाहरण : मूत्रपिंड, फुप्फुसे, हृदय, मेंदू, यकृत, जठर इत्यादी. आकृती : विविध मानवी अंग/ अवयव : प्रत्येक अंग हे विशिष्ट प्रकारच्या पेशींच्या ऊतींपासून तयार होते.

शरीर / Body

१)    ज्याला अवयवांनी / अंगांनी एकत्रितपणे मिळून कार्य करता येते. २)      जे अवयवांनी युक्त आहे ते.  ३)      जे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, प्रजनन पेशी/व्यवस्था/प्रणाली यांच्यातील एक किंवा अधिक घटकांनी निर्मित आहे.  ४)      काया.  ५)      देह.  ६)    तन, तनु.

सजीव / Alive [शब्दार्थकोश | Dictionary]

इमेज
सजीव / Alive : १) जीव असणे. २) जीवनयुक्त. ३) चेतनायुक्त. ४) सचेतन. ५) हालचाल करणारा. ६) त्राण असलेला. ७) शरीर क्रिया सुरू असलेला असलेला जीव.

पेशी / Cells [शब्दार्थकोश | Dictionary]

इमेज
पेशी / Cells : १. सजीव तेचे मूलभूत एकक. २. लहानात लहान सजीव-लक्षणे दर्शवणारा भाग. ३. जीवनाचे मूलभूत एकक. ४. पर्यावरणातील लहानात लहान भाग जो सजीव आहे. सूक्ष्मदर्शी चित्र : कांद्याच्या पेशी  सूक्ष्मदर्शी चित्र : ओवाच्या पानाच्या पेशी

सूक्ष्म / Microscopic, Micro [शब्दार्थकोश | Dictionary]

इमेज
सूक्ष्म / Microscopic, Micro :  सूक्ष्मदर्शक | Microscope  १) अतिशय लहान. २) कोणत्याही उपकरणाच्या मदतीशिवाय फक्त डोळ्यांनी पाहता येणार नाही इतके लहान. ३) मानवी डोळ्यांच्या पाहण्याच्या क्षमतेपेक्षा कमी आकार. ४) लघु.