शरीरातील समान कार्य करणाऱ्या पेशीं चा / ऊतींचा समूह, अवयव. उदाहरण : मूत्रपिंड, फुप्फुसे, हृदय, मेंदू, यकृत, जठर इत्यादी. आकृती : विविध मानवी अंग/ अवयव : प्रत्येक अंग हे विशिष्ट प्रकारच्या पेशींच्या ऊतींपासून तयार होते.
१) ज्याला अवयवांनी / अंगांनी एकत्रितपणे मिळून कार्य करता येते. २) जे अवयवांनी युक्त आहे ते. ३) जे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, प्रजनन पेशी/व्यवस्था/प्रणाली यांच्यातील एक किंवा अधिक घटकांनी निर्मित आहे. ४) काया. ५) देह. ६) तन, तनु.
पेशी / Cells : १. सजीव तेचे मूलभूत एकक. २. लहानात लहान सजीव-लक्षणे दर्शवणारा भाग. ३. जीवनाचे मूलभूत एकक. ४. पर्यावरणातील लहानात लहान भाग जो सजीव आहे. सूक्ष्मदर्शी चित्र : कांद्याच्या पेशी सूक्ष्मदर्शी चित्र : ओवाच्या पानाच्या पेशी
सूक्ष्म / Microscopic, Micro : सूक्ष्मदर्शक | Microscope १) अतिशय लहान. २) कोणत्याही उपकरणाच्या मदतीशिवाय फक्त डोळ्यांनी पाहता येणार नाही इतके लहान. ३) मानवी डोळ्यांच्या पाहण्याच्या क्षमतेपेक्षा कमी आकार. ४) लघु.